MP Pragya Singh sakal
मुंबई

MP Pragya Singh : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ; खासदार प्रज्ञा सिंह यांना सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना मंगळवारपासून (ता.२७) सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीला गैर हजर राहिल्यास आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना मंगळवारपासून (ता.२७) सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीला गैर हजर राहिल्यास आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे. न्या. ए के लाहोटी यांनी हे निर्देश दिले आहेत.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ बाॅम्बस्फोट झाला होता. त्यात सहा लोकांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह एकूण १३ आरोपी असून त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे.

खासदार ठाकूर आणि इतर सहा जणांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या तरतुदींखाली खटला सुरू आहे. विशेष न्यायालय सध्या फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत या आरोपींचे जबाब नोंदवत आहे. मात्र प्रज्ञा सिंह ठाकूर सुनावणीला गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने तिच्या सह इतर आरोपींना सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT