मुंबई

Malegaon Bomblast: बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंग यांना २५ एप्रिलला हजर राहण्याचे निर्देश

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते |On September 29, 2008, a motorcycle bomb exploded near a mosque in Malegaon, killing 6 and injuring over 100 civilians.

सकाळ वृत्तसेवा

Malegaon Blast Case 2009: २००८ सालच्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना २५ एप्रिल रोजी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश विशेष एनआयए न्यायालयाने आज आपण(ता.२०) दिले.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपींपैकी ५ आरोपींची सुटका झाली असून प्रज्ञासिंग व इतर सहा जणांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) व भारतीय दंड संहितेच्या तरतुदींखाली खटला चालवला जात आहे.

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या समोर आज या खटल्यावर सुनावणी होती त्यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलांनी प्रज्ञासिंग यांच्या आजारपणाचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला व एक दिवस सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारत प्रज्ञा सिंह ठाकूर यांना २५ एप्रिल रोजी सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

Latest Marathi News Live Update : गोराई बस डेपोमध्ये दोन विशाल अजगर सापडल्याने खळबळ

'रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध पडले अन्...' दीपाली सय्यदने सांगितला भंयकर प्रसंग, म्हणाली..'माझे डोळे वर गेले आणि...'

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

SCROLL FOR NEXT