मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण! आजपासून विशेष न्यायालयाकडून नियमित सुनावणी

सुनिता महामुनकर


मुंबई ः मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व सातही आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये प्रमुख आरोपी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह राजपूत यांचाही समावेश आहे.

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी बंद होती. मात्र या खटल्याची नियमित सुनावणी घ्यावी, असा अर्ज एका पिडित व्यक्तिकडून करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकिल अविनाश रसाळ यांनी दैनंदिन सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र साक्षीदार वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यांना हजर करायला हवे आणि हे कठिण काम आहे, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. विशेष न्या. पी आर सित्रे यांनी सर्व आरोपींना गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ठाकूरसह लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहीत, यांच्यासह पाचजणांचा समावेश आहे. आतापर्यंत 400 पैकी 140 साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. खटल्यातील यापूर्वीचे न्यायाधिश निवृत्त झाल्यामुळे आणि कोविड 19 मुळे खटल्याला विलंब झाला असे एनआयएच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

मालेगावमध्ये सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहाजण ठार तर शंभरहून अधिकजण जखमी झाले होते. आरोपींनी उच्च न्यायालयातही विविध कारणांसाठी याचिका केल्या आहेत

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT