मुंबई

सरकारच्या एका अटीमुळे मॉल पुन्हा बंद

नामदेव कुंभार

15 ऑगस्टपासून राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये राज्यभरातील मॉल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांना लसीच्या दोन डोसची अट ठेवण्यात आली आहे. या एका अटींमुळे राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने (Federation of Retail Traders Welfare Association) घेतला आहे.

मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले अन् 14 दिवस पूर्ण झालेले असावेत, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. पण मॉलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक ठिकाणाचे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक केल्यामुळे मॉल, शॉपिंग सेंटर बंदच ठेवावी लागणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होण्यास अजून किमान एक महिना लागण्याची शक्यताही संघटनेने व्यक्त केली. तसेच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असेल तरच हे लसीकरण पूर्ण होऊ शकते, असेही संघटनेने म्हटले आहे. कोरोना संकटामुळे मागी वर्षभरापासून मॉल बंधच आहेत, त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपली अट शिथिल करुन एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांसह मॉल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीला राहुल गांधींकडून 'ही' अपेक्षा; वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या भावना

लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७३० पेक्षा कमी CIBIL स्कोअर? कर्ज मिळवणे कठीण होणार; RBI च्या नव्या नियमांचा परिणाम

अवघ्या 3 मिनिटांत घडला चमत्कार! श्वास थांबला, हृदय बंद पडलं... पण डॉक्टरांच्या तत्परतेने चिमुकलीला नवजीवन मिळालं

Yavatmal News : शिंदे सेनेकडून खासदार देशमुखांच्या स्वागताचे फलक झळकले; खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब

ODI World Cup: 2027 विश्वचषकात रोहित-विराट खेळणार? BCCI ने स्पष्टच सांगितलं, विशेष सवलत मिळणार नाही!

SCROLL FOR NEXT