Mumbai Jain Temple Robbery Sakal
मुंबई

Mumbai Crime : "जैन साधूच्या वेशात आला आणि..."; क्राइम पेट्रोल बघून मंदिरात केली मोठी चोरी

जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांना या चोरीचा धडा लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईमधल्या एका जैन मंदिरामध्ये क्राईम पेट्रोल पाहून एका व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा प्रकार पाहून पोलिसही अचंबित झाले आहेत. आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.

आरोपी जैन साधूचा वेष धारण करून मंदिरात चोरी करत असे. पूजेच्या बहाण्याने आरोपी मंदिरात जायचा आणि चोरी करायचा. भरत सुखराज दोशी (५३) असे आरोपीचे नाव असून तो रामचंद्र लेन मालाड (प.) रहिवासी असून जुगार खेळण्यासाठी तो चोरी करत असे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या मालाडमधल्या मंदिरात 160 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट गायब झालं. यानंतर मंदिरातील जैन साधू धीरज लाल शहा याने 23 जानेवारी रोजी दिंडोशी पोलिसांत ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला.

पोलिसांनी जैन मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 93 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर जैन साधूच्या वेश्यातीलच एक व्यक्ती ते सोन्याचे ताट घेऊन पळून गेल्याचे दिसून आले.यानंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच जैन मंदिरातील सोन्याचे ताट चोरल्याचे कबूल केले.

चोरी करण्यापूर्वी आरोपी जैन साधूच्या वेशात परिसरातील विविध जैन मंदिरांची रेकी करत असे. आरोपीला जुगाराचा नाद असल्यामुळे तो चोरी करायचा हे देखील तपासादरम्यान कबूल केले. टीव्हीवरील मालिका क्राइम पेट्रोल पाहून त्याला ही कल्पना सुचली असल्याचेही त्याने कबूल केले. भरत सुखराज दोशी (५३) असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड (प.) येथे राहणारा आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे ताट आणि 160 ग्रॅम वजनाचा वितळवलेला सोन्याचा रॉड आणि स्कूटर जप्त केली आहे. ज्याची एकूण किंमत सुमारे 5 लाख 30 हजार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT