man stops car bandra worli sea link jumps into sea naval coast guard search on sakal
मुंबई

Mumbai News : वांद्रे-वरळी सी-लिंकवर चालकाची समुद्रात उडी; नौदल तटरक्षक दलाकडून शोधमोहीम सुरू

गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंकवरून सोमवारी एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याची घटना घडली आहे. यानंतर घटनास्थळी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. शोध मोहिमेसाठी मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर शोधमोहीमेत रुजू करण्यात आले.

याप्रकरणी स्थानिक वरळी पोलीस अधिक तपास करीत आहेत. टीकम माखिजा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कापड व्यावसायिक होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर माखीजा मानसिक दृष्ट्या खचले होते.

तसेच माखिजा मधुमेहाने त्रस्त होते. या सर्व परिसथितीला कंटाळून 55 वर्षीय टिकंम माखिजा सोमवारी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारली. काही दिवसांपासून वारंवार कुटुंबियांकडे आत्महत्येची मनशा माखिजा व्यक्त करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी सकाळी एक व्यक्ती चारचाकीमधून वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात होती. यानंतर गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तटरक्षक दल आणि इतर अधिकाऱ्यांना आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या कामात हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या घटना

याआधी 45 वर्षीय विक्रम वासुदेव यांनी वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आत्महत्या केली होती. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे ते मानसिक तणावात होते. हाजी अली येथून एका व्यक्तीने लिलावती हॉस्टिपलला जायचं आहे सांगत टॅक्सी बूक केली होती.

त्याने टॅक्सीवाल्याला हाजीअलीच्या दिशेने जाण्यास सांगितलं. दरम्यान टॅक्सी वांद्रे-वरळी सी लिंकवर पोहोचल्यानंतर तो लघुशंकेचा बहाणा करत टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करु लागला. यानंतर अखेर टॅक्सी चालकाने गाडी थांबवली.

यानंतर गाडीतून उतरून त्याने अचानक समुद्रात उडी मारली. दरम्यान याआधीही वांद्रे-वरळी सी लिंकवरुन अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने सरकारकडून उत्तर मागितलं होतं. ज्यानंतर सी-लिंकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवत सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT