Manda Mhatre and Ganesh Naik  sakal media
मुंबई

भाजपला अंतर्गत कूरघोडी महागात पडणार; ऐरोली मतदार संघात मंदा म्हात्रेंचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा (Belapur assembly) मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे (manda mhatre) यांनी थेट आमदार गणेश नाईक (Ganesh naik) यांचा मतदार संघ असणाऱ्या ऐरोलीतील (Airoli peoples problem) नागरी समस्यांना हात घालत शिरकाव केला आहे. ऐरोली मतदार संघातील घणसोली, दिवा आणि ऐरोली येथील मच्छिमार जेटींचा विकास करून जलवाहतूक (Shipping cargo) सुरु करण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी मेरीटाईम बोर्डाकडे (maritime board) केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाईकांनी बेलापूर मतदार संघात येऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन करून म्हात्रे यांना डिवचण्याचे काम केले होते. याला प्रतिउत्तर म्हणून म्हात्रे यांनी थेट ऐरोली मतदार संघातील प्रश्नांना हात घातले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नवी मुंबईतील दादा-ताईंचे विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रृत आहे. परंतू राष्ट्रवादीनंतर भाजपमध्ये आल्यावर या वादावर पडदा पडेल असे सर्वांना वाटत होते. परंतू विधानसभा निवडणूकीच्या तिकीट वाटपावरून एकमेकांच्या वाटेत आणलेले अडथळे पाहील्यानंतर हा वाद आता शितयुद्धामर्गे अतीटोकाला जाताना दिसत आहे. नवी मुंबई शहरात सद्या महापालिकेच्या आगामी निवडणूकाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूकीत नाईकांची महापालिकेवरील निसटत चाललेली एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुठ आवळली आहे. त्याला शह देण्यासाठी नाईकांकडून वेग-वेगळे हातकंडे आजमावले जात आहेत.

परंतु हे करताना आपल्यात पक्षातील ज्येष्ठ सहकारी आमदारांना डावलले जात असल्याचे वारंवार वेग-वेगळ्या घटनांमधून समोर आले आहे. याबाबत भाजपच्या पक्षश्रेष्टींकडूनही फारशी दखल घेतली जात नसल्याने थेट बेलापूर मतदार संघात नागरी विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये म्हात्रे यांना बाजूला सारण्याचे काम सुरु होते. एका खाजगी कार्यक्रमात बोलताना आपल्याला एक महिला म्हणून स्वकीयांकडूनच डावलेले जात असल्याची खंत म्हात्रे यांनी अलिकडेच बोलून दाखवली होती. अशा परिस्थितीत थेट ऐरोली मतदार संघातील विकास कामांचा म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केल्याने शहाला काटशहा देण्याचा प्रयत्न म्हात्रे यांनी केला आहे.

बेलापूर विधानसभा मतदार संघातील दिवाळे, करावे आणि वाशी गाव येथील जेटीच्या कामांसोबकत ऐरोली मतदार संघातील जेटींच्या कामांबाबत केलेल्या मागणीची माहिती घेण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या दरम्यान म्हात्रे यांनी ऐरोली मतदार संघातील समस्या आणि विकास प्रकल्प राबवणार असल्याचे सांगितले. परंतू आपल्याला राजकारण करायचे नाही. कोणाला प्रतिआव्हान द्यायचे नाही. कोळी बांधवांकरीता जेटी तयार करण्याचा प्रकल्प गेले अनेक वर्षे राबवत आहे. तसा नवी मुंबईतील प्रवाशांकरीता हे प्रकल्प उभारण्याची मागणी केली असल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT