Crime sakal
मुंबई

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावरच खाल्यानंतर १९ वर्षीय प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावरच खाल्यानंतर १९ वर्षीय प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली असती तर अशी घटनाच घडली नसती. मात्र या घटनेत आरोग्य विभागातील अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्थानिक गर्जना संघटनेने पालिकेच्या एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदनातद्वारे केली आहे.

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यावरच खाल्याने ६ जणांना विषबाधा झाल्याची घटना ६ मे रोजी घडली होती. या घटनेत सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाला. गोरेगाव येथे ही काही दिवसांपूर्वी शोरमा खाल्यानंतर १२ जणांना विषबाधा झाल्याची श घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही दगावले नाही.

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पालिकेला जाग येते आणि कारवाईचा आव आणते. मात्र एखाद्याच्या कुटुंबातील तरुण मुलचा मृत्यू होणे यामुळे कुटुंबियांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होते.

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात घडलेल्या घटने आधी पालिका प्रशासनाने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली असती तर अशी घटना घडलीच नसती. मात्र महाराष्ट्र नगर परिसरातील ही घटना म्हणजे बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे भोकसे याचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱयांविरुद्ध गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात येऊन त्वरित निलंबित करावे, अशी मागणी पालिकेच्या एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून केल्याचे गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT