Mankoli Bridge sakal
मुंबई

Mankoli Bridge : माणकोली उड्डाणपूल लोड टेस्टिंगसाठी बंद

डोंबिवलीवरून ठाणे किंंवा नाशिककडे जाण्यासाठी कमी अंतराचा व मोकळा रस्ता म्हणून नागरिक माणकोली उड्डाणपुलाला पसंती देत आहेत. या पुलाचे उदघाटन नागरिकांनीच त्यावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीवरून ठाणे किंंवा नाशिककडे जाण्यासाठी कमी अंतराचा व मोकळा रस्ता म्हणून नागरिक माणकोली उड्डाणपुलाला पसंती देत आहेत. या पुलाचे उदघाटन नागरिकांनीच त्यावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली आहे. परंतु सोमवार पासून पुढील चार दिवस हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. एमएमआरडीए कडून पुलाची लोड टेस्टिंग करण्यात येणार असल्याने पूल वाहतुकीसाठी बंद असल्याचे कळविण्यात आले आहे. परिणामी लोकांना चार दिवस कल्याण शीळ रोड मार्गे आपला प्रवास करावा लागणार आहे.

वाहतूकिला विना अडथळा, सुसाट वेगाने अगदी काही मिनिटांत डोंबिवली ते भिवंडी हे अंतर पार करत ठाणे, नाशिक दिशेला माणकोली उड्डाणपुलावरून जाता येते. यामुळे नागरिक या पुलावरील प्रवासाला पसंती देत आहेत. माणकोली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी त्याला जोड रस्त्यांचे, रिंगरूट रस्ता, मोठागाव फाटक येथील उड्डाणपूल आदी अनेक कामे शिल्लक आहेत. डोंबिवली मधील रस्ते अरुंद असल्याने हा पूल खुला केल्यास डोंबिवली मधील वाहन कोंडीची समस्या आणखी तीव्र होऊ शकते. आदी कारणांमुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

कल्याण शीळ मार्गावरील लांबचा वळसा व वाहन कोंडीच्या समस्येला त्रासलेल्या नागरिकांनी पुलाच्या उदघाटनांची प्रतीक्षा न करता त्यावरून वाहतूक सुरू केली. ही बाब लक्षात येताच एमएमआरडीए प्रशासनाने पूल बंद केला. मात्र प्रवाशांनी पुलावरील एक मार्गिका खुली करत येथून रोजचा प्रवास सुरु केला आहे.

पुलाचे लोड टेस्टिंगचे काम शिल्लक असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. आता 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीत एमएमआरडीए कडून या पुलाचे लोड टेस्टिंग करण्यात येणार आहे. एमएमआरडीए प्रशासनाकडून तशी जाहीर सूचना काढण्यात आली आहे. यामुळे चार दिवस हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी नागरिकांना आता कल्याण शीळ मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

  • - पुलाचे लोड टेस्टिंगचे काम पूर्ण झाल्यावर हा पूल वाहनांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.

  • - माणकोली पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाला नसताना डोंबिवली शहर कोंडीत अडकू लागले आहे. प्रत्यक्षात पूल सुरू झाल्यावर डोंबिवली शहर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कोंडीत अडकण्याची चिन्हे आहेत.

  • - रेतीबंंदर रेल्वे फाटकावरील उड्डाण पूलाची लवकर उभारणी केली जाणे आवश्यक आहे. तसेच पुलाला असणाऱ्या जोड रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक.

  • - रस्ता वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT