Manoj Jarange  sakal
मुंबई

Manoj Jarange: "'सगे-सोयरे' लागू करा अन्यथा विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार देणार"; मनोज जरांगेंची घोषणा

Manoj Jarange announces assembly election: मनोज जरांगे हे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आक्रमक होताना दिसत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा सामाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सगे-सोयरे अधिसूचनेची अंलबजावणी राज्य सरकारनं करावी, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. (Manoj Jarange announcement to gives candidates on 288 seats in assembly election if sage soyare notification not apply)

"सगे-सोयरेंची अंमलबजावणी केली नाही तसंच मराठा आणि कुणबी एकच आहेत हे जर राज्य सरकारनं मंजूर केलं नाही, तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेच्या २८८ जागांवर सर्व जातीधर्माचे उमेदवार उभे करणार," अशी घोषणा मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. यासाठी त्यांनी गेल्या वर्षी राज्यातील राजकारण ढवळून काढलं होतं. अनेकदा त्यांनी यासाठी उपाषण केलं. त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारनं त्यांच्या कही मागण्या मान्यही केल्या. पण जरांगे हे मराठा समाजातील लोकांना सगे-सोयरे या नियमानं ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी लावून धरली. त्यासाठी त्यांनी थेट मुंबईला धडक दिली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची अधिसूचना काढली होती. तसंच ज्या मराठ्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे आदेश देत त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली.

पण मराठ्यांचा कुणबी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मान्य केली नाही. त्याऐवजी विधानसभेच विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाज मागास असल्याच्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरुन १० टक्के एसईबीसी आरक्षण लागू केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT