Maratha Reservation 
मुंबई

Maratha Reservation: लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळा, दीपक केसरकरांचे मराठा बांधवांना आवाहन, वक्तव्याचा अर्थ काय?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात पोहोचली असून आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. अंदाजे साडेतीन लाख मराठे पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

Sandip Kapde

Maratha Reservation:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात पोहोचली असून आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. अंदाजे साडेतीन लाख मराठे पदयात्रेत सहभागी झाले आहेत. आज पदयात्रेचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची यात्रा औंध मार्ग राजीव गांधी पूलमार्गे पुणे मुंबई महामार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार आहे. दरम्यान लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळला जावा, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?,अशी चर्चा निर्माण झाली आहे. मनोज जरांगे यांनी कागदपत्रांची पडताळणी करावी, असे दीपक केसरकर म्हणाले.

मनोज जरांगे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होत की आम्ही मुंबईच्या वाटेवर असताना जर रस्त्यार सरकारने काही निर्णय घेतला तर आम्ही तिथंच गुलाल उधळू, आता दीपक केसरकर यांच्या निर्णयामुळे सरकार काही निर्णय घेणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांनी नोटीस देण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. यावर केसरकर म्हणाले,  प्रत्येक सरकारची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था टिकवणे आहे. म्हणून कोर्टात तशी भूमिका घ्यावी लागते. मराठा समाजाला दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. जो अर्ज करेल त्याला दाखल देण्यात येत आहेत.

सरकार मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत आहे. सरकार सकारात्मक आहे. समाजाला अपील करतो की मागण्या तर पूर्ण झाल्या आहेत. त्यांना दाखले देखील मिळत आहेत. ते दाखली तुम्हाला गावातच मिळणार आहेत. त्यासाठी मुंबईत येण्याची गरज नाही, असे केसरकर म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT