मुंबई

Manoj Jarange In Mumbai: मराठा आंदोलकांच्या सोयीसाठी नवी मुंबई सज्ज; प्रत्येक जण देत आहे योगदान!

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange In Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्या या आंदोलनात लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आंदोलकांच्या व्यवस्थेसाठी नवी मुंबईतील स्थानिक मराठा बांधव सरसावला आहे. यासाठी विविध माध्यमांतून मदतीचा ओघ सुरू झाला असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण काहींना काही योगदान देत आहे.

नेरूळ येथील पंच परमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईमध्ये आलेल्या मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सीवूड्स सेक्टर ४८ ए येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे सामुदायिकरित्या नागरिकांनी समूह संकलन करून भोजनाची व्यवस्था माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

तसेच मोर्चात सहभागी नागरिकांना रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता, पाण्याच्या बाटल्या आदींची व्यवस्था करण्यात आली. याचबरोबर खारघर सेक्टर १५ येथील घरकुल सोसायटी, तसेच खारघर सेक्टर ११ येथील बँक ऑफ बडोदासमोरील मैदान येथे एकत्रित भोजन संकलन करण्यात आले आहे. सीबीडीमध्ये मराठा मोर्चाच्या वतीने, तर तुर्भे येथील बाळकृष्ण खोपडे पाटील यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिलांच्या राहण्याची व्यवस्था

एमपीएससी मार्केटमध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या लाखो समर्थकांसोबत मुक्काम करणार आहेत. याच पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील विविध मराठा सामाजिक संस्था, मंडळे, चॅरिटेबल ट्रस्ट मदतीसाठी सरसावले आहेत. सामुदायिक अन्न संकलन केले जात आहे, तर दुसरीकडे सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये महिलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT