Crime  esakal
मुंबई

Manpada Police Station : मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..

तिघे दुचाकीवरुन आले, दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम, मोबाईल चोरुन नेले.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - ते तिघे दुचाकीवरुन आले, दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम, मोबाईल चोरुन नेले. मेडिकल आणि किराणा मालाचे दुकान चोरट्यांनी एकाच रात्री फोडले असून दुकानातील लाखोंचा माल चोरुन नेला आहे.

चोरीची ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून काही दिवसांपूर्वीच एमआयडीसी निवासी भागातील तीन घरे चोरट्यांनी फोडली होती. यामुळे भुरट्या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान मानपाडा पोलिसांसमोर आहे.कल्याण डोंबिवली परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गुन्ह्यांची उकल करत चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येत असले तरी गुन्हे गारीचे प्रमाण रोखण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात गुरुवारी पहाटे चोरांनी दोन दुकाने फोडून त्यातील सव्वा लाखाचा माल चोरुन नेला आहे. पहाटेच्या वेळी तीन चोर दुचाकीवरुन या परिसरात आले.

त्यातील एक जण खाली उतरला त्याने मेडिकलचे शटर उचकटून आत प्रवेश केला. मोडिकल मधील रोख रक्कम चोरल्यानंतर हा चोरटा बाहेर पडला. त्यांनी बाजूला असलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे देखील शटर उचकटले व त्यातील रोख रक्कम व काही सामान चोरुन तेथून पळ काढला.

पहाटे दुकान उघडण्यासाठी मालक आले असता दुकानात चोरी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. दोन्ही दुकानातील सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

ही सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करत तपास सुरु केला आहे. चोरांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी विनीत म्हात्रे यांनी केली आहे.

गेल्या काहि दिवसांपासून मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरींचे प्रमाण वाढले आहे. एमआयडीसी निवासी भागातील तीन घरे चोरट्यांनी फोडली होती. मानपाडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची खूर्ची गेले दोन महिने रिकामी आहे.

पोलिस निरिक्षकांच्या खांद्यावर पोलिस ठाण्याचा भार सोपविण्यात आला आहे. मात्र कल्याण परिमंडळ 3 मधील मानपाडा पोलिस ठाण्याची हद्द ही सर्वात मोठी असून या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. असे असताना ही रिकामी खुर्ची का भरली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rate Today : सोने -चांदी दरात घसरण, चांदी तब्बल ५ हजारांनी उतरली तर सोने १२०० रुपयांनी घसरले

मुलुंडमध्ये रस्त्याच्या कामावेळी पुन्हा दुर्घटना, लोखंडी पिलर कारवर कोसळला

Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरची अर्थसंकल्पात घोषणा शक्य; पूर्वतयारी पूर्ण, ४ हजार कोटींच्या प्रकल्पाने बदलणार पंढरपूरचे रूप!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१४ ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीवर न्यायालयीन स्थगिती

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT