Ashok Honmane sakal
मुंबई

Dombivali News : मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी अशोक होनमाणे यांची नियुक्ती

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांची मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी निवड करण्यात आली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांची मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त ठाणे शहर आयुक्तालयाकडून हा आदेश जारी करण्यात आले असून त्यांनी त्वरीत आपला पदभार स्वीकारावा असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

कल्याण परिमंडळ 3 मधील मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर हे पद रिकामे होते. अखेर या पदावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाणे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 न (1) व (2) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना जनहितार्थ, विशेष बाब व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अशोक होनमाणे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे अशी बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे.

या नियुक्ती आदेशाचे पत्रक ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आले आहे. अशोक होनमाने यांनी तात्काळ त्यांचे पदाचा कार्यभार दुय्यम पोलीस अधिकारी महात्मा फुल चौक पोलीस ठाणे यांचेकडे सुपुर्द करून बदली ठिकाणी हजर व्हावे असे आदेश ठाणे शहर पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT