मुंबई

मनसुख प्रकरण: बीकेसीच्या मिठी नदीत NIAची शोधमोहिम; पाहा काय-काय सापडलं...

विराज भागवत

मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये स्फोटके सापडली होती. त्या प्रकारानंतर कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. स्फोटकांच्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIAने ताब्यात घेत चौकशी केली आणि नंतर अटकही केली. मनसुख मृत्यूप्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATS करत होते. पण दोन दिवसांपूर्वी त्याचाही तपास NIAकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाचा तपास NIAकडे आल्यानंतर त्यांनी रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य सुरू केलं. स्फोटकांच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेने गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे मिठी नदीत फेकल्याचे समजले. त्यानंतर NIA ने रविवारी दुपारी मिठी नदीत शोधमोहिम राबवली. NIAच्या टीमबरोबरच सचिन वाझेलाही या ठिकाणी नेण्यात आलं होते.

मनसुख हिरेन याच्या हत्येच्या तपासासाठी NIAने डायव्हर्ससह स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेतली. या खाडीत वाझेने पुरावा म्हणून वापरता येऊ शकेल असे काही सीसीटिव्हींचे डिव्हीआर टाकल्याची माहिती NIAला मिळाली होती. त्या आधारावर डायव्हर्सनी मिठी नदीत बराच वेळ शोधमोहिम राबवली. सुमारे दीड तासांच्या शोझकार्यानंतर मिठीनदीच्या खाडीतून कॉम्प्युटरचे दोन सीपीयु, एकसारखेच रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या दोन नंबर प्लेट, एक हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. याशिवाय, डायव्हर्सना खाडीतून दोन डीव्हीआर, एक लॅपटॉप, एक प्रिंटरही सापडला असल्याची चर्चा आहे.

सचिन वाझे आणि त्याचे काही सहकारी यांनी मनसुख हिरेनची हत्या केली आणि त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही बाबी मिठीनदीत फेकल्या अशी माहिती NIAला मिळाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर NIAने शोधकार्य हाती घेत महत्त्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या. या गोष्टी हस्तगत केल्याने तपासाला अधिक गती मिळेल अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT