Sachin-Vaze-Pradeep-Sharma 
मुंबई

सचिन वाझे प्रकरणात नवा ट्विस्ट; एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची चौकशी

विराज भागवत

मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण या दोन्ही प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे हा प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास NIA करत असून यासंबंधी बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू असतानाच काही वेळाने एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मां हेदेखील NIA च्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या चौकशीमुळे या प्रकरणाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे सचिन वाझेच्या संपर्कात होते. परमबीर सिंह हे जेव्हा ठाणे पोलीस आयुक्त होते तेव्हा प्रदीप शर्मा यांची ठाणे विभागाच्या खंडणी विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली होती. वाझे CIU  कार्यालयात कार्यरत असताना शर्मा त्याला भेटायला आले होते. त्यावेळी परमबीर यांचीही शर्मा यांनी भेट घेतली होती असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांच्याकडून ज्या 14 सिमकार्ड्सबाबत चौकशी केली जात आहे, त्यातील एक सिमकार्ड हे अंधेरीत बंद केल्याचे तपासात समोर आले आहेत. 2  मार्चला सचिन वाझे आणि विनायक शिंदेने पश्चिम उपनगरात एक मिटिंग केली होती. ती मिटींग प्रदीप शर्मांसोबतच झाली असा संशय तपास यंत्रणेला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

3 मार्च रोजी सचिन वाझेने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वाझे पुन्हा अंधेरीला गेला, तेव्हादेखील त्याने प्रदीप शर्मांची भेट घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जैश उल हिंद या संघटनेने स्फोटक प्रकरणाची जबाबदारी स्विकारली होती आणि काही तासात मागेही घेतली. या मागेही शर्मांची हात असल्याचं बोललं जातं आहे. वाझेच्या अटकेनंतर शर्मा ATS कार्यालयात गेले होते आणि त्यांनी त्यांनी परमबीर सिंह यांची भेटही घेतली होती अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात प्रदीप शर्मांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग आहे का हे तपासण्यासाठी आज NIAने शर्मांना चौकशीसाठी बोलवलं असल्याचे NIA सूत्रांकडून समजले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Anant Ambani Tirupati Temple : अनंत अंबानींकडून तिरुपतीच्या मंदिराला २७.५ कोटींची देणगी; 25 इलेक्ट्रिक बससह ड्रायव्हरचा पगारही रिलायन्स देणार

Zimbabwe Vs Bangladesh: झिम्बाब्वेचा ऐतिहासिक पराक्रम! बांगलादेशचा एक डाव आणि 85 धावांनी पराभव, कसोटीतील सर्वात मोठा विजय

आता वडिलांसोबत फार बोलत नाही कारण... वडील गिरीश ओक यांच्याबद्दल स्पष्टच बोलली गिरीजा, म्हणाली, 'त्यांच्याबद्दल आदर...'

Mechanized Paddy Cultivation: मुळशी तालुक्यात २५ एकरांवर यांत्रिक भात लागवडीचा प्रयोग; खर्चात बचत, उत्पादनात दहा टनांपर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT