sachin-waze 2.jpg 
मुंबई

मनसुखची हत्या करण्यासाठी सचिन वाझेचा लोकल प्रवास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: लोकलच्या गर्दीत ओळख पटण कठीण असल्याने सचिन वाझे मोबाइल  ऑफीसला ठेवून ठाण्याला लोकलने गेल्याचं तपासात समोर आलं आहे. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून वाझेंनी  मोबाइल कार्यालयात ठेवून एका मित्राला तो मोबाइल उचलण्यासाठी ठेवलं होतं. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.

दरम्यान सचिन वाझे सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर ७ च्या सुमारास CCTVमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर तो ठाणे स्थानकाबाहेर दिसला आहे. पुन्हा लकलनेच प्रवास करून तो  भायखळ्याला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेला. ज्यावेळी त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सोबत मोबाइल घेऊन येण्यास सांगितले, जेणेकरून ते सर्व लोकेशन एकत्र दिसतील आणि वाझेवर कुणाला संशयही येणार नाही.

मात्र NIA ने हिरेन हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे? त्या दिवशी कोण घटनास्थळी होतं? याचा तपास करत आहे. हिरेनची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्याचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलं आहे. 

त्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डाँक्टरही आता रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरेन हा संशयित व्यक्ती असताना. त्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन व्हिडिओ रेकाँर्डिंग का केलं नाही. शवविच्छेदनावेळी डाँक्टरांनी वाजेची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली. याची माहिती NIA घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT