sachin-waze 2.jpg 
मुंबई

मनसुखचा मृतदेह गाडीत असताना पोलिसच वाझेच्या गाडीला संरक्षण देत होते?

सकाळ डिजिटल टीम

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात API सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत असताना आणखी दोन पोलीस निरीक्षक एनआयएच्या रडारवर आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावरही आरोप आहे. चार मार्च रोजी  गायमुख चौपाटीपासून ठाणे खाडीपर्यंत पीआय रँकच्या एका अधिकाऱ्याची गाडी सचिन वाझे यांच्या गाडी सोबत होती. एकप्रकारे त्यांनी वाझेच्या गाडीला संरक्षण दिलं. पोलिसांच्या नाकाबंदीचा अडसर येऊ नये, यासाठी हे स्कॉटिंग दिल्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखवली आहे. 

पीआय रँकचा अधिकारी वाझे यांच्या गाडीसोबत असताना, त्या गाडीत मनसुख हिरेन असल्याचा एनआयएला संशय आहे. मनसुखचा मृतदेह फेकण्यासाठी ते जात असल्याचा संशय आहे. 

एनआयएच्या माहितीनुसार,  पीआय रँकचा दुसरा  अधिकारी त्यावेळेस सीआययुच्या कार्यालयात होता. त्यावेळी वाझे यांचा मोबाईलही कार्यालयात होता. फोन आला तर वाझे व्यस्त आहेत, असे उत्तर देण्यास त्या दुसऱ्या पीआयला सांगण्यात आले होते. पण तेव्हा वाझे यांना एकही फोन आला नाही. एनआयएने त्या दिवशीचा सीडीआर काढला . मात्र यात फक्त वाजेंना ८ जाहिरातीचे मेसेज आले होते.

मनसुख हिरेनचा मृतदेह पाच मार्च रोजी मुंब्रा येथील खाडीत सापडला. या प्रकरणात आतापर्यंत सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट करणारे अनेक पुरावे समोर आले आहेत. अजूनही पुरावे सापडत आहेत. राज्याच्या राजकारणात या प्रकरणाने एकच खळबळ उडवून दिली आहे. याच प्रकरणामुळे परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन गच्छंती झाली. त्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले. आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.  

(संपादन - दीनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT