Mansukh-Hiren 
मुंबई

मनसुख हिरेनला विष देण्यात आलं होतं का? तपासात सत्य उघड

Mansukh Hiren Murder Case: व्हिसेरा अहवालात देण्यात आलीय महत्त्वाची माहिती

अनिश पाटील

Mansukh Hiren Murder Case: व्हिसेरा अहवालात देण्यात आलीय महत्त्वाची माहिती

मुंबई: ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) व्हिसेरा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मनसुख यांचा मृत्यू (Death) कोणतेही वीष (Poison) देऊन करण्यात आला नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार (Report), मनसुख यांच्या शरीरात विषारी पदार्थाचा कोणताही अंश सापडला नसल्याचे नमुद करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी (Sources) सांगितले. यापूर्वी शवविच्छेदन (Post Mortem) अहवालात मनसुख हिरेनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नव्हते. (Mansukh Hiren Murder Case No traces of poison found in Mansukh Body NIA Claims)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ कार ताब्यात असलेला ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा खाडी परिसरात सापडला होता. मनसुख यांचा व्हिसेरा अहवाल एनआयएला प्राप्त झाला असून त्यात शरिरात कोणताही विषारी पदार्थ सापडला नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा अहवाल प्रथम ठाणे पोलिसांकडे पाठवण्यात आला होता. पण हे प्रकरण एनआयएकडे असल्यामुळे तो अहवाल एनआयएला सुपूर्त करण्यात आला आहे. एनआयएनेही याप्रकरणी व्हिसेरा नमुने केंद्रीय न्यायवैधक प्रयोगशाळेकडे पाठवणार असून त्यांच्याकडूनही त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बुडून हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचा संशय अधिक आहे. तसेच मृतदेह पाण्यावर लवकर येऊ नये, यासाठी आरोपींनी तोंडात रुमाल कोंबले होते. त्यावेळी डायटॉप तपासणीही करण्यात आली होती.

मनसुख यांची पत्नी विमन हिरेन यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाला(एटीएस) वर्ग करण्यात आले होते. मनसुख यांच्या चेहऱ्याजवळ, डोळ्यावर आणि पाठीवर जखमा असल्याची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाली होती. याप्रकरणी 302, 201, 34 व 120(ब) अंतर्गत हत्या, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे हे प्रकरणही एनआयएला वर्ग करण्यात आले होते. त्यावेळी शवविच्छेदन अहवाला नुसार, मनसुख यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखी बळावला होता. शवविच्छेदन अहवालमध्ये जखमांबाबत उल्लेख होता.

मनसुख यांच्या शरीरावर असलेल्या या जखमा एक सेंटिमीटरच्या आहेत. मनसुख यांचा मृतदेह 8 ते 10 तास पाण्यात पडून होता. त्यामुळे पाण्यातील काही जीवांमुळे या जखमा झाल्यात का याबद्दल खुलासा होणे बाकी आहे. या जखमा नेमक्या कधी झाल्यात हे यात नमूद होणे आवश्यक होते. मात्र त्यात हे नमूद करण्यात आलेले नाही. मनसुख हिरेन यांचा मृत्यू 12 ते 14 तासांपूर्वी झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे स्पष्ट झाले होते. पण मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे याप्रकरणी व्हिसेरा चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT