मुंबई

Mansukh Hiren: पुरावे शोधण्यासाठी NIA कडून 'ही' पाच ठिकाणं निश्चित

पूजा विचारे

मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये स्फोटके सापडली होती. त्या प्रकारानंतर कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. स्फोटकांच्या प्रकरणात वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे याला NIAने ताब्यात घेत चौकशी केली आणि नंतर अटकही केली. मनसुख मृत्यूप्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATS करत होते. पण दोन दिवसांपूर्वी त्याचाही तपास NIAकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाचा तपास NIAकडे आल्यानंतर त्यांनी रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य सुरू केलं. आता NIAनं पुरावे शोधण्यासाठी आतापर्यंत पाच ठिकाणी निश्चित केली आहे. 

या पाच ठिकाणांमध्ये पहिलं ठिकाण मुलुंड आहे. ज्या ठिकाणी वाझेनं गुन्ह्यातील सदरा जाळला होता. त्यानंतर माहिम हे दुसरं ठिकाण असेल. वाझेनं काही पुरावे माहिमच्या खाडीत टाकल्याचंही कळतंय. मनसुखचं दुकान, ज्यातील CCTV वाझेनं त्याच्या सहकाऱ्यांना सांगून काढून नेले. त्या ठिकाणीही एनआयए तपास करणार आहे. सोसायटी परिसर ठाणे, ज्या ठिकाणाहून गुन्ह्यातील गाडी हस्तगत केली. तसंच बाबुलनाथ ज्या ठिकाणी वाजेनं त्याच्या खासगी फोन गहाळ झाल्याचा दावा केला आहे, या ठिकाणीही एनआयए पोहोचून शोधकार्य राबवणार आहे. 

BKC ज्या ठिकाणी काल NIA नं सर्च ऑपरेशन राबवून, महत्वाचे पुरावे जमा केले. मात्र अद्याप जिलेटिन बाबत NIAला कोणतीही लिंक सापडली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

बीकेसीच्या मिठी नदीत NIAची शोधमोहिम

या प्रकरणाचा तपास NIAकडे आल्यानंतर त्यांनी रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य सुरू केलं. स्फोटकांच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेने गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे मिठी नदीत फेकल्याचे समजले. त्यानंतर NIA ने रविवारी दुपारी मिठी नदीत शोधमोहिम राबवली. NIAच्या टीमबरोबरच सचिन वाझेलाही या ठिकाणी नेण्यात आलं होते.

मनसुख हिरेन याच्या हत्येच्या तपासासाठी NIAने डायव्हर्ससह स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेतली. या खाडीत वाझेने पुरावा म्हणून वापरता येऊ शकेल असे काही सीसीटिव्हींचे डिव्हीआर टाकल्याची माहिती NIAला मिळाली होती. त्या आधारावर डायव्हर्सनी मिठी नदीत बराच वेळ शोधमोहिम राबवली. सुमारे दीड तासांच्या शोझकार्यानंतर मिठीनदीच्या खाडीतून कॉम्प्युटरचे दोन सीपीयु, एकसारखेच रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या दोन नंबर प्लेट, एक हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. याशिवाय, डायव्हर्सना खाडीतून दोन डीव्हीआर, एक लॅपटॉप, एक प्रिंटरही सापडला असल्याची चर्चा आहे.

सचिन वाझे आणि त्याचे काही सहकारी यांनी मनसुख हिरेनची हत्या केली आणि त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही बाबी मिठीनदीत फेकल्या अशी माहिती NIAला मिळाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर NIAने शोधकार्य हाती घेत महत्त्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या. या गोष्टी हस्तगत केल्याने तपासाला अधिक गती मिळेल अशी चर्चा आहे.

Mansukh Hiren NIA fixed five places  identified look for evidence

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT