Maratha community protest Dadar on behalf of Maratha Kranti Morcha and Sambhaji Brigade jalna violence sakal
मुंबई

Mumbai News : मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने दादरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन

जालना जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जालना जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे.

राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे. रविवारी मुंबईच्या दादर परिसरात आंदोलन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुंबईत दादरच्या वीर कोतवाल उद्यान येथे सकाळी 11 वाजता निषेध आंदोलन सुरू करण्यात आले.

मोठ्या संख्येने स्त्री पुरुष कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काळ्या फिती बांधून तसेच घोषणा देत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठा समाजाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याच्या घोषणा आंदोलनात देण्यात आल्या.दरम्यान, गृहमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलनांचं सत्र सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

मुंबईत मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जविरोधात आपला रोष व्यक्त करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रविवारी आंदोलनासाठी जमले. रविवारी सकाळीच आंदोलनाला सुरुवात झाली परंतु परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती.

पोलिसांनी आंदोलन आझाद मैदानात हलवण्याचे आदेश देऊनही मरीन ड्राईव्हवर आंदोलन करण्याच्या निर्धारावर कार्यकर्ते ठाम राहिले.अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह मुलाचा सहभाग, विजयसिंह बाळ बांगर यांचा आरोप

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT