मुंबई

"एक मराठा, लाख मराठा" म्हणत आज मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

सुमित बागुल

मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्यसरकार काहीच प्रयत्न करीत नाही असे देखील आरोप मराठा समाजाकडून केले जात आहेत. अशात राज्यातील सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी मशाल मोर्चा धडकणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मशाल मोर्चाला सुरवात होणार आहे. एकीकडे मुंबईत मशाल मोर्चा काढला जाणार आहे तर पंढरपूरातून देखील मंत्रालयाच्या दिशेने मोर्चेकरी पायी निघणार आहेत. दरम्यान या मोर्चाला पंढरपूरातून परवानगी मिळालेली नाही. पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

मशाल मोर्चाबाबत बोलताना मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील म्हणालेत की, मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक, मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार आहेत. 

मराठा समाजातील तरूणांचे शैक्षणिक आणि नोकरभरती यासंदर्भात राज्य सरकार जोपर्यंत भुमिका स्पष्ट करत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी हालचाल करत नाही तोपर्यंत राज्यात प्रवेश प्रक्रिया आणी नोकरभरती राबवू दिली जाणार नाही. राज्याच्या गृहमत्र्यांनी पोलिसभरती करू आशी घोषणा केली असली तरी मराठा समाजाला बाजूला ठेऊन पोलिसभरती केल्यास मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पोलिसभरतीला राज्यभर विरोध केला जाईल. पुढील होणाऱ्या परिणामास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल, असेही मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले. 

maratha kranti morcha to conduct mashal morcha at matoshri for lifting stay of maratha reservation


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT