Manoj Jaranage Patil Maratha Reservation News 
मुंबई

Maratha Victory: मिळवून दाखवलं का नाही! मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना खिजवलं!

Manoj Jaranage Patil Maratha Reservation News:मनोज जरांगे पाटील यांचे वाशीच्या शिवाजी चौकामध्ये विजयी स्वागत करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मनोज जरांगे पाटील यांचे वाशीच्या शिवाजी चौकामध्ये विजयी स्वागत करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असं म्हणत होते. पण, मिळवलं का नाही आरक्षण, मराठे सोपे नाहीत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

तुम्ही पुढे पण अडचणी आणा आम्ही तेव्हाही लढू. सरकारने सर्व सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला का नाही! हा आमचा सातबारा आहे. आता आरक्षण पक्क झालं आहे. जे आवश्यक होतं ते आम्ही घेतलं आहे. मराठवाड्यासाठी गॅझेट घेतलं आहे. अनेकजण म्हणायचे मुंबईत जाऊन रिकाम्या हाताने परत येणार. पण, शेवटी आरक्षण घेऊनच मुंबईतून परत जातोय, असं जरांगे पाटील म्हणाले.

कितीही ट्रॅप रचू द्या, कितीही आरोप करु द्या. पण, मराठा समाज माझ्या पाठिशी होता. मुंबईत आल्यावर देखील ट्रॅप रचण्यात आला होता. पण, मी ठरवलं होतं घाबरायचं नाही. आरक्षण मिळवूनच परत यायचं. मराठा समाजाने खूप संघर्ष केलाय. पण, सर्व सगेसोयरे यांना आरक्षणात घेण्याचं काम आम्ही केलं. ते सोप काम नव्हती, असं ते म्हणाले.

काहीजण मुंबईत येऊ म्हणत धमक्या देत होते, पण घेतलं का नाही आरक्षण. घेतलंच, असं म्हणत त्यांनी मुंबईत ओबीसी समाज धडकणार असं म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पुढे काही अडचणी आली तरी, घोळ घालण्याचा प्रयत्न झाला तर मी पुन्हा उपोषण करण्यास तयार होईल, असं जरांगे पाटील म्हणाले. देत नाही म्हणत होते पण आणलं का नाही खेचून, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT