मुंबई

मराठा आरक्षण सुनावणीआधी उध्दव ठाकरे यांची मराठा नेत्यांसोबत चर्चा, मुख्यमंत्री म्हणाले...

संजय मिस्कीन

मुंबई, ता. 12 : महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत मजबूत बाजू मांडल्याने सर्व याचिकाकर्त्यांना सुनावणीत बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. मराठा आरक्षणासाठी ही बाब एक सुसंधी असल्याने सर्व याचिकाकर्त्यांनी आरक्षणाबाबच्या विविध विषयांचे वर्गीकरण करून तेवढ्याच बाबीवर सक्षमपणे बाजू मांडावी. यामुळे महाराष्ट्राचे काम एक टीम म्हणून समोर येईल. असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मराठा नेते व याचिकाकर्ते यांना केले. व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे व मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या बैठकीचे आयोजन केले होते. यामधे खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व आरक्षणाचा लढा लढणारे वकिल हजर होते. 

येत्या 15 मार्च पासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी होणार आहे. याबाबत राज्य सरकारची तयारी आणि काही सुचना ऐकून घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. जेष्ठ वकिलांनी याबाबतच्या तयारीची माहिती बैठकीत दिली. त्यावर खासदार संभाजीराजे, उदयनराजे, आमदार विनायक मेटे, मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र कोंढरे, याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांच्यासह अनेकांनी भूमिका मांडली. 

एक रणनिती म्हणून सर्व याचिका कर्त्यांच्या वकिलांची बैठक घेवून त्यांना कोणत्या विषयावर बाजू मांडावी याबाबत एक निश्चित धोरण ठरवण्याची गरज असल्याची सूचना विनायक मेटे यांनी केली. त्यावरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारची बाजू मांडणार्या वकिलांना तशा सूचना केल्या. 

दरम्यान 102 व्या घटनादुरुस्तीनुसार देशातील सर्वच राज्य या प्रकरणात सहभागी होणार असतील तर त्याला वेळ लागेल. त्यासाठी राज्य सरकारनेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत मराठा आरक्षणासोबतच मराठा समाजाच्या इतर प्रश्नावरही सविस्तर चर्चा झाली. 

maratha reservation in maharashtra cm uddhav thackeray called meeting of maratha leadera

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT