maratha reservation protest theft cases of gold and mobile phone police action sakal
मुंबई

Navi Mumbai Crime : मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी केली हात की सफाई; 18 तोळे सोन्याचे दागिने 3 मोबाईल लंपास

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा काढली होती. सदरची पदयात्रा शुक्रवारी सकाळी नवी मुंबई दाखल झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईत वाशीमध्ये दाखल झालेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये असलेल्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी हात की सफाई करून ९ जणांचे तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व तीन जणांचे मोबाईल फोन असा तब्बल पावणे चार लाखांचां ऐवज लंपास केल्याचे उघडकिस आले आहे.

वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा काढली होती.

सदरची पदयात्रा शुक्रवारी सकाळी नवी मुंबई दाखल झाली होती. या पदयात्रेमध्ये राज्यभरातील लाखो मराठा बांधव हजारो वाहनांसह सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याने संपूर्ण मराठा समाजातील बांधव या ठिकाणी जमले होते.

या सभेसाठी मनोज जरांगे पाटील हे १ वाजता व्यासपीठावर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या गोंधळात काही प्रमाणात धक्काबुक्की झाली.

याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधून ऐरोलीतून या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले संजीव पिंगळे (५५) तसेच कोपरखैरणेतून आलेले ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद जाधव या दोघांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरली. त्यानंतर पिंगळे आणि जाधव यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, दुपारी बारा वाजताची अपूर्ण राहिलेली मनोज जरांगे पाटील यांची सभा सायंकाळी चारच्या सुमारास पुन्हा वाशीतील शिवाजी चौकात सुरू झाली. याही वेळी मराठा बांधवांनी वाशीतील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने झालेल्या गोंधळात व धक्काबुक्कीत चोरट्यांनी संधी साधून आणखी ७ जणांच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच तीन जणांचे मोबाईल फोन चोरले.

या सर्वांनी देखील वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अशा पद्धतीने मराठा समाजाच्या मोर्चामध्ये घुसलेल्या चोरट्यांनी नऊ जणांचे तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याच्या चैन तसेच तीन मोबाईल फोन असा तब्बल पावणे चार लाख रुपये किमतीचा ऐवज चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर वाशी पोलिसांनी या सर्वांची तक्रार एकत्रित करून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT