मुंबई

मराठी कलाकारांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत ते कलाकार?

संतोष भिंगार्डे

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार तसेच निर्माता व दिग्दर्शकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी मान्यवर मंडळीही उपस्थित होती.

ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार हे त्यांनी आधीच जाहीर केले होते. परंतु कधी आणि केव्हा करणार याबाबत काहीच सांगण्यात आले नव्हते. अखेर दोन दिवसीय विधानसभेचे अधिवेशन संपले आणि तिसऱ्या दिवशीच काही मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हातात घेतला. सविता मालपेकर, अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक विजय पाटकर, लेखक व अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदी मंडळींसह अन्य काही जणांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. अभिनेते विजय पाटकर म्हणाले, की लोककलावंत तसेच मराठी व नाट्यसृष्टीला भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही राजकारणात उतरत आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT