Marathi Engineering  
मुंबई

मराठीतून अभियांत्रिकी शिक्षणासाठी सर्वाधिक प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इंग्रजी विषयाची भीती दूर करून देशातील प्रत्येक राज्यातील मातृभाषेतून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने यंदापासून सुरू केलेल्या मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षणाला देशात मराठी भाषेतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. सर्वात जास्त प्रवेश हे मराठीतून झाले असल्याची माहिती परिषदेने जाहीर केली आहे.

इंग्रजी भाषेची भीती दूर करण्यासाठी मागील वर्षी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने यासाठी धोरण आणले होते. त्या धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासून आठ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलगु, तामिळ, गुजराती, कानडी आणि मल्यालळ या भाषांचा समावेश होता. यासाठी देशातील १९ महाविद्यालयांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याची तयारी दर्शविली होती. यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये देशभरातील १ हजार २३० जागांपैकी २५५ जागा भरल्या आहेत.

देशातील मातृभाषांमध्ये सर्वाधिक मराठी भाषेच्या ६० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याखालोखाल तामिळमध्ये ५० बंगालीमध्ये १६ तर तेलगु भाषेत १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कानडी भाषेत एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश होऊ शकला नाही. या राज्यातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी आपली पसंती दाखवली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

8th Pay Commission : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल ३३८ टक्क्यांपर्यंत वाढ, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

एक्सप्रेस वेवर एक्झिट चुकले, पुढे युटर्न ऐवजी रिव्हर्स घेतली कार; मागून स्कॉर्पिओची धडक, कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT