traffic police song sakal
मुंबई

Marathi Language Day : मराठी भाषा दिनानिमित्त वाहतूक पोलिसांची अनोखी जनजागृती; गाण्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे प्रबोधन

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मीम्स आता केवळ मनोरंजनासाठी राहिलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या मीम्स जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मीम्स आता केवळ मनोरंजनासाठी राहिलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या मीम्स जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत. राजकीय पक्ष, सरकार, विविध संस्था, पोलीस इत्यादी हल्ली माहिती व जागरूकता पसरवण्यासाठी या मीम्सचा वापर करीत आहेत. हाच ट्रेंड जोपासत मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी मंगळवारी ट्विटरवर जाऊन मराठी भाषादिनानिमित्त गाण्याच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेची जनजागृती केली आहे.

ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! पाहूया ही गाणी आपल्याला काय संदेश देत आहेत. या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करूया गगनाची, वाहतूक सुरक्षेचे नियम देती निश्चिती सुरक्षित जीवनाची!

वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, ज्यावर बसताना वापरू हेल्मेटची जोडी !

हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, पण ते करत असताना सीटबेल्टही लावू आठवणीने !

वाहतूक पोलिसांकडून भरधाव वेगात वाहन चालवणे, हेल्मेटचा आणि सिटबेल्टचा वापर न करणे या नियम उल्लंघनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मराठी गाण्याच्या ओळी वापर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT