मुंबई

पश्‍चिम रेल्वेला मराठी भाषेचे वावडे! अधिकाऱ्यांना बाराखडीची पुस्तके देण्याचा इशारा 

कुलदीप घायवट

मुंबई : पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत आहे; मात्र सर्व कारभार इंग्रजी आणि हिंदी भाषेतून होतोय. वारंवार तक्रारी करूनही पश्‍चिम रेल्वेकडून मराठी भाषेला डावलले जात आहे. पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला त्रिभाषासूत्री नियमांचा विसर झाल्याचे दिसून येत आहे. 
समाजमाध्यमांवरील पश्‍चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक मुंबई सेंट्रल खात्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर केला जात आहे; तर पश्‍चिम रेल्वेकडून प्राप्त होणारी प्रसिद्धिपत्रकेही फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत दिली जातात. पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने यापुढे मराठी भाषेला डावलल्यास त्यांना मराठी बाराखडीची पुस्तके वाटून तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया मराठी भाषिकांकडून देण्यात आली. 

राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयात इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठीचा वापर करणे बंधनकारक आहे; मात्र असे असताना पश्‍चिम रेल्वे आपल्या दैनंदिन वापरात मराठी भाषेला स्थान देत नाही. पश्‍चिम रेल्वेवरील गाड्यांची माहिती, प्रसिद्धिपत्रके हिंदी, इंग्रजी भाषेतूनच प्रसिद्ध होत आहेत. समाजमाध्यमांवरील पश्‍चिम रेल्वेच्या खात्यावरून सर्वाधिक वापर इंग्रजी, हिंदीचा केला जातो; परंतु महाराष्ट्रात पश्‍चिम रेल्वेची बहुतांश स्थानके आहेत. त्यामुळे इतर भाषेप्रमाणे समतुल्य मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. येत्या दिवसांत पश्‍चिम रेल्वेने कामकाजात मराठी भाषेचा वापर न केल्यास तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीचे शिलेदार सागर पाटील यांनी मांडली. 

राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग काय करत आहे? मराठी भाषा विभागाने पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला पत्र देऊनही त्या पत्राला जुमानले जात नाही. राज्य सरकारचे राज्यातच काही चालत नसल्याचे दिसून येत आहे. आता आम्हीच एका आमदाराची ताकद दाखवून मनसे शैलीने पश्‍चिम रेल्वे मराठीमय करणार आहोत. 
- अखिल चित्रे,
मनसे नेते 


पश्‍चिम रेल्वे प्रशासनाला सातत्याने मराठी भाषेची आठवण करून देणे दुर्दैवी बाब आहे. अनेक मराठीप्रेमी मराठी भाषेची मागणी करत आहेत; मात्र पश्‍चिम रेल्वेला त्रिभाषासूत्रीचा विसर पडत चालला आहे. आता पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने मराठी डावलल्यास रेल्वे अधिकाऱ्यांना बाराखडीची पुस्तके वाटप करू. 
- जितेंद्र पाटील,
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT