मुंबई

कोरोना महामारीचा पोटापाण्यावर फटका! 66% लोकांच्या रोजगारावर परिणाम, मानसिक आजारातही भर

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड -19 महामारीचा आजारावर त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी मुंबईतील सर्व प्रभागांमधील 2,087 लोकांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की किमान 66 टक्के लोकांनी त्यांच्या नोकर्‍यांवर विपरित परिणाम झाला आहे. म्हणजेच कोरोना महामारीचा सर्वात जास्त फटका हा उदरनिर्वाहावर झाला आहे.  

 मुंबईत कोविड-19 चा परिणाम
- उपजिविका, आरोग्य, शिक्षण, घरे आणि परिवहन यांबाबत नागरिकांचे सर्वेक्षण” याबाबत प्रजा फाऊंडेशनने सर्वेक्षण केले. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 
“ सर्वच क्षेत्रातील उपजिविका आणि रोजगाराला फटका बसला आहे.  लॉकडाऊनमुळे नोकरीवर परिणाम झाल्याचे तिघांपैकी दोन जणांनी सांगितले. त्यातील 36 टक्के लोकांना बिनापगारी सुट्टी घ्यावी लागली, 28% लोकांचा पगार कमी केला गेला, 25%नी बिनपगारी काम केले आणि 13% नी जादा तास काम केले वा त्यांच्यावरील कामाचा भार वाढला”, अशी माहिती प्रजाचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.  
कामासाठी सर्व देशभरातून मुंबईत स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे, मात्र महामारीच्या काळात मुंबईबाहेर जाणाऱ्यांचे प्रमाण बरेच मोठे होते. लॉकडाऊन काळात काम गेल्याने मुंबईबाहेर स्थलांतरित झाल्याचे 57% लोकांनी सांगितले आणि त्यापैकी 80% सामाजिक-आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील नागरिक होते”, प्रजाचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.

मानसिक आधारित ही भर -
जीवनशैलीतही फरक पडल्याचे, लोकांचे प्राधान्यक्रम बदलल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. घरातून काम करणाऱ्यांपैकी 63% जणांनी यापुढेही घरातूनच काम करणार असल्याचे म्हटले ज्यात 70% स्त्रिया, 59% पुरुषांचा समावेश आहे. कामाला जाताना आधी जी प्रवासाची साधने वापरली जात होती त्यापेक्षा आता चालत किंवा बस ने जाणे यावर अधिक भर दिला जात असल्याचे दिसते. मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या. अलगीकरणामुळे आलेला शारीरिक व मानसिक ताण आणि काम जाणे, पगार न मिळणे, स्व-विलगीकरण इत्यादींमुळे मानसिक स्वास्थ्य खालावल्याचे दिसून येते. चिंता व ताण वाढल्याचे 60% जणांनी सांगितले, मात्र 84% नी आपण आपल्या मानसिक आरोग्याविषयी कोणाशीही बोललो नाही असेही सांगितले.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news Corona epidemic Impact on the employment of 66% of people prajha foundation report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT