crime 
मुंबई

अनैतिक संबंधातून हत्या 

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : जन्मदात्या आईचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून तिच्या दोन मुलांनी कट रचून 50 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. 24) भिवंडीतील संगमपाडा येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फरारी आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

अब्दुल हफिज अन्सारी मृत व्यक्तीचे नाव आहे. सरफराज शेख व सैफ शेख अशी आरोपींची नावे आहेत. भिवंडी शहरात संगमपाडा-पांजरापोळ येथील चाळीत अब्दुल अन्सारी राहत होता. एका शिधावाटपाच्या दुकानात तो काम करत होता. दोन वर्षांपासून त्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. हे कळल्यावर तिच्या मुलांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही हा प्रकार थांबला नव्हता. याचा राग मनात धरून सरफराज व सैफ यांनी अब्दुल दुकानातून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यात अब्दुल जखमी झाले होते. स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, मुंबईतील रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निजामपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT