Kalyan-Nagari-suvidha-kendr
Kalyan-Nagari-suvidha-kendr 
मुंबई

निवडणूक कामामुळे पालिका मुख्यालय व प्रभागक्षेत्र कार्यालय पडले ओस

रविंद्र खरात

कल्याण : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 388 कर्मचाऱ्यांना निवडणूकीचे काम देण्यात आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासहीत पूर्वमधील जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालयासहीत अन्य प्रभाग क्षेत्र कार्यालय ओस पडल्याने नागरीकांना चांगलाच त्रास झाला तर यामुळे पालिकेला ही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 

लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत समिती निवडणूक आल्या की कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला निवडणूकीचे कामकाज दिले जाते, त्यामुळे पालिकेतील प्रशासकीय कामकाजावर चांगलाच परीणाम होतो. 

13 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणूक असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील तृतीय श्रेणीचे 258 आणि चतृर्थी श्रेणीचे 130 असे एकूण 388 कर्मचाऱ्यांना निवडणूकीचे कामकाज देण्यात आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासहीत प्रभाग क्षेत्र कार्यालय कर्मचारी वर्ग नसल्याने नागरीकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. तर कल्याण पूर्व मधील पालिकेच्या जे/4 प्रभाग कार्यालयामधील नागरी सुविधा केंद्र बंद होते तर अन्य ठिकाणी तुरळक सुरू होते त्यामुळे नागरीकांना मालमत्ता, पाणी बिल भरण्यास त्रास सहन करावा लागला. 

कुठल्याही निवडणूक आल्या की कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील अधिकारी कर्मचारी वर्गाची निवडणूक कामासाठी सर्वात जास्त नेमणूक केल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असताना यावर पर्याय देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने पालिकेला दरवर्षी आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. 

अगोदरच महानगरपालिका आर्थिक संकटातून जात असताना निवडणूक काळात नागरी सुविधा केंद्र बंद राहिल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत पालिका प्रशासनाची झाली आहे. होणारे आर्थिक नुकसान भरपाई पालिका प्रशासन कसे भरून काढते याकडे लक्ष्य लागले आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 

निवडणूक कामा निमित्त कर्मचारी अधिकारी वर्गाची नेमणूक केल्याने काही नागरी सुविधा केंद्र बंद असल्यास नागरिकांनी पालिका मुख्यालय मधील नागरी सुविधा केंद्रात येऊन बिल भरावे असे आवाहन पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केले आहे . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT