File photo of Rickshaws
File photo of Rickshaws 
मुंबई

खारघरच्या रिक्षाचालकांना 'आरटीओ'च्या नोटिसा 

सकाळवृत्तसेवा

खारघर : खारघरमधील रिक्षा बंदची प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दखल घेत 72 रिक्षाचालकांना परवाने रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

खारघर रेल्वे स्थानकावर 21 नोव्हेंबर रोजी रिक्षा थांबविण्यावरून तळोजा व खारघरमधील रिक्षाचालकांमध्ये वाद झाला होता. त्या वेळी तळोजा येथील रिक्षाचालकांनी खारघरच्या रिक्षाचालकांना मारहाण केल्याचे कारण पुढे करून रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. खारघर एकता संघटनेचे सुमारे 800 सदस्य बंदमध्ये सहभागी झाले आहेत. 
या संदर्भात सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी 29 नोव्हेंबर रोजी आरटीओ अधिकाऱ्यांसह खारघर व तळोजा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व रिक्षाचालकांची बैठक घेतली होती. 

या बैठकीत रिक्षा परवाना मिळाल्यानंतर कुठेही रिक्षा चालवू शकतो. रिक्षा थांबा हा कोणाच्या मालकीचा नसतो. त्यामुळे आपापसात चर्चा करून प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला होता; मात्र खारघरमधील रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पनवेल येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोहीम हाती घेतली. त्यानंतर 72 रिक्षाचालकांना परवाने का रद्द करू नयेत, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT