Helicopter 
मुंबई

मुलाची आईला स्पेशल भेट;हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा केली पूर्ण

धुणीभांडी करून शिक्षित करणाऱ्या विधवा आईची हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा मुलांनी पूर्ण केली,

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : लहान असतानाच वडिलांचे निधन (Death) झाल्यावर धुणीभांडी करून मुलांना शिक्षित करणाऱ्या विधवा आईचे पांग आज तिच्या दोन मुलांनी फेडले आहे. आईची (Mother) हेलिकॉप्टर (Helicopter) मध्ये बसण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे.

मूळ सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या रेखा गरड ह्या तिच्या दोन मुलांसोबत उल्हासनगरातील महादेव नगरमध्ये राहतात.मुले लहान असताना त्यांच्या पतीचे निधन झाल्यावर त्यांनी प्रदिप आणि संदीप या मुलांना धुणीभांडी करून शिक्षित केले.मुलांनी चाळीतून इमारतीत फ्लॅट घेतला.एकदा आकाशातून जाणाऱ्या हेलिकॉप्टर कडे रेखा गरड यांनी बघितले.आणि कधितरी हेलिकॉप्टरमधून सैरसपाटा मारावासा वाटतो अशी इच्छा व्यक्त मुलांकडे व्यक्त केली होती.

आईची ही इच्छा प्रदिप,संदीपच्या लक्षात होती. ती आज त्यांनी आईच्या ५० व्या वाढदिवशी पूर्ण केली.आईच्या पुण्याईने चांगल्या ठिकाणी नोकरीला असलेल्या प्रदीपने यासाठी संपूर्ण माहिती जमा केली.मुंबई केस्ट्रेल अव्हिएशन या कंपनी मार्फत मुंबई राईडच्या मार्फत आईला हेलिकॉप्टरमधून सैर करून दिली.आईसोबत प्रदिप,संदीप, प्रदीपची पत्नी मुले यांनीही अर्धा तास हेलिकॉप्टरचा आनंद लुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT