Death 
मुंबई

लुटारूंच्या मारहाणीत..जखमी अभियंत्याचा मृत्यू

Crime News: जबर मारहाण केली आणि रिक्षात घालून नंतर खंबाळपाडा येथील रस्त्याकडेला फेकून दिले.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली ः लुटारूंच्या (Robber) मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अभियंत्याचा (Engineer) मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. कृष्णमोहन तिवारी (वय ४७) असे मृताचे नाव आहे. नोकरी मिळवून देतो, असे सांगून चौघांच्या टोळीने कृष्णमोहन यांना अज्ञातस्थळी बोलावून घेतले होते.

या वेळी कृष्णमोहन त्या ठिकाणी पोहोचताच लुटारूंनी त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू काढून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी विरोध केल्याने चौघांनी मिळून कृष्णमोहन यांना जबर मारहाण केली आणि रिक्षात घालून नंतर खंबाळपाडा येथील रस्त्याकडेला फेकून दिले. कृष्णमोहन हे शनिवारी दुपारी बारा वाजता खंबाळपाडा परिसरात जखमी अवस्थेत पडून असल्याचे पोलिस हवालदार बी. होरे यांना आढळले. त्यांनी त्यांना उपचारासाठी शिवम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रिहान शेख (२१), सागर पोनाला (२०), सुमित सोनवणे (२०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची महिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. रिहान हा दिवा येथील नोकरीची माहिती देणाऱ्या संस्थेत काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

SCROLL FOR NEXT