court 
मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : वाहनतळाच्या जागांच्या कमतरतेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कशी मर्यादित करणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महापालिका आणि वाहतूक विभागाला केली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटी शनिवार-रविवारऐवजी अन्य दिवशी करण्याचा विचार करावा, अशी सूचनाही न्यायालयाने राज्य सरकारला केली. 

वाहनतळासाठी जागा असेल, तरच गाडी खरेदी करण्याची परवानगी देण्याच्या सक्तीचे परिवहन विभाग काय करणार आहे, असा प्रश्‍नही न्यायालयाने विचारला. वाहतुकीच्या वाढत्या समस्या आणि वाहनतळाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर न्या. नरेश पाटील आणि न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वारेमाप गाड्यांना परवानगी देऊन नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर राज्य सरकार अतिक्रमण करत आहे, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. एका घरामध्ये किंवा एका व्यक्तीकडे किती गाड्या आहेत, याबाबत तुमच्याकडे तपशीलवार यादी आहे का, असेही न्यायालयाने पालिकेला विचारले. दररोज लाखो गाड्यांची नोंदणी केली जाते; मात्र वाहनतळाचा विचारही केला जात नाही. अशा प्रकारचा कारभार चालणार नाही, पालिकेने याबाबत तपशील दाखल करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकेवर दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. 

जलवाहतुकीचा विचार करा! 
वाहतुकीची समस्या वाढत असल्याने पादचाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे याबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्यायाचा विचारही सरकारने करावा, असेही न्यायालयाने सुचवले; मात्र या पर्यायावर अद्याप विचार केला नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

पुण्यात विवाहितेनं ७ वर्षांच्या चिमुकल्यासोबत १८व्या मजल्यावरून मारली उडी; CCTV फूटेज पोलिसांच्या हाती; काय घडलं?

Viral Video: ज्यांनी इमारत उभी केली, त्यांनाच लिफ्टमध्ये जागा नाही! २१ मजले डोक्यावर ओझं घेऊन चढणाऱ्या मजुराचा VIDEO पाहून डोळे पाणावतील!

'Motorola Signature 27' 5 नोव्हेंबरला होणार लाँच! 200MP कॅमेरा आणि 7 वर्षांच्या OS अपडेट्ससह सज्ज; पाहा भन्नाट फीचर्स...

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

SCROLL FOR NEXT