marathi news mumbai Seismometer
marathi news mumbai Seismometer  
मुंबई

अखेर वाळवंड्यात भूकंप यंत्र बसविले

भगवान खैरनार

मोखाडा - गेली दोन महिण्यांपासून भूकंपाच्या दहशतीने हैराण झालेल्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील आदिवासींना दिल्लीहुन आलेल्या तज्ञांनी भूकंप मापक यंत्रणा बसवून दिलासा दिला आहे. दिल्लीच्या सिस्मोनोजी विभागाचे मनजित सिंग व कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याचे किरण तरखेडे यांनी येथील परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच येथील नागरीकांशी संवाद साधत अशा परिस्थितीत काय करावे, काय करू नये याविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील भूकंपाविषयीचे भय काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शासन स्तरावरून मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. 

जव्हार तालुक्यातील वाळवंडा सह डेंगाचीमेट, धानोशी, कासटवाडी यांसह अन्य गाव खेड्यांना भूकंपाच्या धक्क्याने हादरवले होते. त्यामुळे येथील आदिवासी भयभीत झाले आहेत. ऐन थंडीत येथील आदिवासी घरदार सोडून, भूकंपाच्या दहशतीने माळरानावर शेतात आश्रय घेतला आहे. या घटनेविषयी माध्यमातून आवाज ऊठविल्यानंतर शासन खडबडून जागे झाले आहे. दोन महिण्याच्या प्रतिक्षेनंतर शासनाने याची दखल घेतली आहे. या भागाची पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या सिस्मोनोजी विभागाचे मनजित सिंग, भारतीय हवामान खाते कुलाबा येथील किरण तरखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांच्या सह जव्हार चे नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे व धर्मराज पाटील यांनी वाळवंडा गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे.

येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात भूकंप मापक यंत्र बसविले आहे. यावेळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. दरम्यान, सदराच्या यंत्राद्वारे भूकंपाची तीव्रता समजली जाणार असून त्यानंतर येथे कोणत्या उपाययोजना करायच्या या विषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे या पथकाने ग्रामस्थांना सांगितले आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत काय करावे, काय करू नये याविषयी मार्गदर्शन केले आहे. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे सांगून शासन स्तरावरून आपल्याला मदत केली जाईल असा दिलासा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT