corona 
मुंबई

ज्येष्ठ नागरिकांनो, काळजी घ्या; दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग

६० वर्षांवरील नागरिकांनी कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. शिवाय, पहिला डोस घेऊन संसर्ग होण्यामध्येही ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनावर उपयुक्त लस (Corona Vaccination) घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे; मात्र कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना (Corona) झाल्याची माहिती पालिकेने (Mumbai Municipal Corporation) नुकतीच जाहीर केली. त्यातच पॉझिटिव्ह येण्याचे सर्वाधिक प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये (Senior citizens)असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य टास्क फोर्सने (State Task Force) केले आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दोन्ही डोस घेतलेल्या ९ हजार नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यातही ६० वर्षांवरील नागरिकांनी कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. शिवाय, पहिला डोस घेऊन संसर्ग होण्यामध्येही ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर आहेत. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आतापर्यंत एक कोटी ५९ लाख ६ हजार ४१३ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात ६० वर्षांवरील तीन लाख २८ हजार ६८० नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी जवळपास ५ हजार ४ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. याचे प्रमाण तरुणांपेक्षा जास्त असून १.५२ टक्के नागरिक कोरोनाबाधित झाले; तर ६० वर्षांवरील ७ लाख ५७ हजार ६९९ नागरिकांचा दुसरा डोस झाला असून त्यातील जवळपास चार हजार ४७९ म्हणजेच ०.५९ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन टास्क फोर्सकडून करण्यात आले.

कोरोनाची तिसरी लाट अद्याप आली नसली, तरी ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. कारण सर्वाधिक मृत्यूंचा धोका हा याच वयोगटाला असू शकतो.

- डॉ. अविनाश सुपे, सदस्य, टास्क फोर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT