Azad-ground 
मुंबई

सकल ओबीसी समाज संघटनेचे आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण

पूनम कुलकर्णी

मुंबई : ओबीसी प्रवर्गातील पिढ्यानपिढ्या भूमिहीन अल्पभूधारक तसेच विद्यार्थी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच सावित्रीबाई फुले यांचा मरणोत्तर सन्मान भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देऊन करण्यात यावा. तसेच सावित्रीबाई फुले जयंती शिक्षक दिन म्हणून शासनाने घोषित करावी यासाठी सकल ओबीसी समाज संघटनेकडून सोमवारी (ता. 11) महापालिका मुख्य कार्यालयासमोरील आझाद मैदान या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी सकल ओबीसी समाजाच्या महाराष्ट्र अध्यक्षा कांचन नाईक म्हणाल्या, सावित्रीबाई फुले देशाच्या या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका असून त्यांच्या सन्मानार्थ भारतरत्न मिळालाच पाहिजे. तसेच 3 जानेवारी हा दिवस देशात शिक्षक दिन म्हणून शासनाच्या वतीने घोषित करण्यात यावा या मागण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात आज मुंबई येथून करण्यात आली आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात यासाठी तसेच 3 जानेवारी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी 3 जानेवारीपर्यंत हे लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र मधील अनेक ठिकाणी होणार आहे.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही शांतातपूर्वक उपोषणाचा मार्ग निवडला आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करू असही त्या म्हणाल्या. उपोषणात सहभागी झालेले ओबीसी नेते अशोक गीते म्हणाले, ओबीसी प्रवर्गातील मुलांना देखील अद्यायावत वसतिगृहात त्वरित उपलब्ध करून देण्यात यावीत. तसेच या मागण्या ओबीसींच्या प्रलंबित महत्वाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ओबीसी नेत्यांना राज्यात फिरण्यास अटकाव करू व महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी या वेळेस दिला.


उपोषणाला विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या युवा आधार फाउंडेशन या सामजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख उबाळे यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना गोरख उबाळे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात या विद्यार्थ्यांसाठी कमी प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत वसतिगृहात जागांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क मिळायला हवा. सर्वोत्तम राहण्याची शैक्षणिक व्यवस्था व्हायला हवी यासाठी ही संघटना उपोषण करत आहे या उपोषणाला आमचा संपूर्ण पाठिंबा असून सरकारने संघटनेच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.

या लाक्षणिक उपोषणात निसार अली सय्यद ओबीसी समाज उपाध्यक्ष, वैशाली महाडिक उपाध्यक्ष, शिला पटेल कोषाध्यक्ष , अफजल अन्सारी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष, सोनल मुखीया वॉर्ड 33 सकल ओबीसी समाज अध्यक्षा, गोरख उबाळे संस्थापक अध्यक्ष युवा आधार फाउंडेशन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT