election
election 
मुंबई

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस

सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस या चार राजकीय पक्षाच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून दीड वर्षानंतर येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मिनी मंत्रालाय निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. मात्र भिवंडीतील  जिल्हा परिषदेच्या खोणी गटातून कॉग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्यात दुबळी ठरलेल्या कॉग्रेसने जि. प. निवडणूकमध्ये खाते उघडल्याने भाजप शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे,

भिवंडी तालुक्यात भाजपचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तर मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे शहापुरातील आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडमध्ये सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी आमदार गोटीराम पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.

जिल्हा परिषदेचे भिवंडीत २१ शहापुरात १४ मुरबाडमध्ये ८ कल्याणमध्ये ६ आणि अंबरनाथमध्ये ४ गट मिळून असे ५३ गट आहे भिवंडीत शिवसेना व भाजप तुल्यबळ आहेत. शहापुरात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मुरबाडमध्ये भाजपविरोधात काही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आहे. तर कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. अंबरनाथमध्ये भाजप व शिवसेनेची स्थिती चांगली आहे. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षातच खऱ्या लढती  होणार असून भिवंडी व शहापूर तालुक्यात तब्बल ३५ जागा  जिल्हा परिषदेच्या असल्यामुळे दोन्ही तालुक्यातच जिल्हा परिषदेचे वर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे आज होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT