Marathi News_BMC_School_Mahaparinirvaan Din 
मुंबई

मुंबईत आलेल्या अनुयायांची व्यवस्था महापालिका शाळांमध्ये 

पूनम कुलकर्णी

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारोंच्या संख्येने शिवाजी पार्क मध्ये महापरिनिर्वाण दिनाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या अनुयायांची रहाण्याची व्यवस्था दादर स्थित शिवाजी पार्क मैदानात मुंबई महापालिकेने केली आहे. परंतु सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क येथे राहण्यासाठी विसावलेल्या अनुयायांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. 

शिवाजी पार्क मैदानात लाल माती असल्यामुळे पावसाच्या हलक्या सरींमुळे देखील याठिकाणी प्रचंड प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे शिवाजी पार्क येथे विसावलेल्या अनुयायांना जमिनीवर बसता येत नव्हते अनेक वेळ हे अनुयायी मैदानात तातकळले होते. 

पावसामुळे झालेल्या चिखलात राहता येणार नाही त्यामुळे मुंबई मध्ये दादर विभागात असलेल्या महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्यासाठी सोमवारी रात्री महापालिका प्रशासनाने या अनुयायांची व्यवस्था केली. 

तसेच पालिका प्रशासनाने व्यवस्था करून दिलेल्या शाळा, महाविद्यालयामध्ये राहण्यासाठी या अनुयायांना महापालिका आणि विविध संघटनांकडून सोशल मिडियाद्वारे आवाहन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT