Divorce Divorce
मुंबई

जोडप्याने केले दोनदा लग्न अन् घेतला दोनदा घटस्फोट; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पारशी जोडप्याला परस्पर संमतीने दुसऱ्यांदा घटस्फोट मंजूर केला. त्यांनी एकमेकांशी दोनदा लग्न (Marriage) केले होते. जाणून घ्या काय आहे दोन लग्न आणि दोन घटस्फोटाचे प्रकरण.

पारशी जोडप्याने सप्टेंबर २००४ मध्ये लग्न केले होते. विशेष विवाह कायदा १९५४च्या तरतुदीनुसार धर्मनिरपेक्ष कायदा म्हणून नोंदणी केली. २१ डिसेंबर २००४ रोजी कुटुंबीय आणि नातेवाइकांच्या आग्रहास्तव पारशी रीतीरिवाजांनुसार विवाह (Marriage) झाला. यावेळी पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा १९३६ अंतर्गत विवाहाची नोंदणी झाली.

लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये काही मुद्द्यांवरून भांडणे होत होती. यामुळेच मार्च २०१८ पासून दोघेही वेगळे राहू लागले होते. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी दोघांची समजूत काढण्याचा अनेक प्रयत्न केला. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाहाची नोंदणी करण्यासाठी आणि दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी (divorce) ठाणे (thane) कौटुंबिक न्यायालयात गेल्या वर्षी संयुक्त याचिका दाखल केली होती. जी कोर्टाने मान्य केली.

६ जानेवारी २०२२ रोजी ठाणे कौटुंबिक न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली आणि तलाक मान्य केला. यानंतर दोघांनी परस्पर संमतीने दुसऱ्या घटस्फोटासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या एकल खंडपीठाने शुक्रवारी दोन वेगवेगळ्या कायद्यांतर्गत वाद निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांच्या संयुक्त याचिकेला परवानगी दिली. ठाणे न्यायालयाने दिलेला घटस्फोट हा पहिल्या लग्नाचा होता, पारशी प्रथेनुसार नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT