मुंबई

जेंव्हा नेमकं कुठे जायचं हा प्रश्न भेडसावत होता, तेंव्हा मदतीला उभं राहिलेलं 'मसीना'

भाग्यश्री भुवड

मुंबई, 15 : कोरोनाची लाट मुंबईत आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बसला. त्यातच नियमावलीमुळे उपचार नेमके कुठे करायचे असा प्रश्न भेडसावत होता. अशातच काही ना काही कारणांमुळे भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणे ही कठीण झाले होते. मात्र, याही परिस्थितीत भाजलेल्या रुग्णांसाठी भायखळा येथील मसीना रुग्णालय हे जीवनदायी ठरले आहे.

कोरोना महामारीदरम्यान जवळपास 50 हून अधिक भाजलेल्या रुग्णांवर मसीना रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत. शिवाय, जे रुग्ण अति गंभीर भाजलेले नव्हते आणि ज्यांना स्वतःच्या घरी उपचार घेणे शक्य होते अशा रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या ड्रेसिंगचे प्रशिक्षण दिले गेले. ज्यामुळे, त्यांचा कोविडशी येणारा संबंध टाळता आला.

महामारीच्या दरम्यान 50 हून अधिक भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि दररोज त्यांची ड्रेसिंग केली गेली. शिवाय, रूग्णांच्या नातेवाईकांना ड्रेसिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांचा धोका कमी करण्याचा प्रयत्न देखील केला असे मसीना रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि सर्जन डॉ. एसएन मेहरा यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांसाठी विशेष रणनीती, युतीसाठी महाराष्ट्रातील बडा नेता घेणार फडणवीसांची भेट
https://www.esakal.com/mumbai/upcoming-elections-rpi-leader-ramdas-athawale-meet-bjp-leader-devendra-fadanavis-409365

पोस्ट कोविडचेही रुग्ण वाढते 

कोरोनाचे रुग्ण हाताळताना पोस्ट कोविड लक्षणांचे रुग्ण वाढत गेले. त्यासाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली. ज्याचा फायदा रुग्णांना झाला. साधारणत: अंदाजे 50-70 रूग्ण आमच्या ओपीडीला भेट देतात आणि नोव्हेंबर 2020 पासून संख्या कायम आहे. आता हळूहळू संख्या वाढत आहे. 

कोरोना काळातही रुग्णसेवेवर भर -

दरम्यान, कोरोना काळातही मसीनातील डॉक्टरांनी रुग्णसेवा करत तीव्र कोविड इमर्जन्सी आणि कोविड नसलेल्या इमर्जन्सी असे रुग्ण हाताळले. ज्यादरम्यान, एक फिवर ओपीडी आणि एक सिक्युरिटी स्क्रीनिंग सिस्टम सुरू केली. ज्यामध्ये रुग्णालयात दाखल होत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली गेली. ताप असल्याचा संशय असल्यास त्यावर उपचार केले गेले. रूग्णालय 30 खाटांच्या मोजक्या संख्येबरोबर सुरु झाले ज्यामध्ये 9 बेड्स होल्डिंग ट्रायएज एरिया म्हणून समाविष्ट केले गेले होते. जिथे असे रुग्ण ज्यांची कोविडची स्थिती अज्ञात होती परंतु ज्यांच्यामध्ये कोविड 19 ची लक्षणे होती त्यांना किंवा अशा रुग्णांना ज्यांना छाती दुखणे, न्यूरोलॉजिकल लक्षणे, श्वासोच्छवासाच्या अडचणी, फ्रॅक्चर, गायनेकोलॉजिकल आणि ऑब्स्टॅट्रिक (प्रसूती) इमर्जन्सी, तीव्र किडनी केयर, डायलिसिस आणि इतर अशा इमर्जन्सीसाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती त्यांना येथे ठेवण्यात आले.

नातेवाईकांना प्रशिक्षण -

50 पैकी जे रुग्ण गंभीररित्या भाजले नव्हते अशा रुग्णांच्या नातेवाईकांना ड्रेसिंग करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. ज्यामुळे, त्यांचा येण्या जाण्याचा त्रास वाचला. शिवाय, कोरोनाचा धोकाही टाळता आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT