Masina Hospital Mumbai

 

esakal

मुंबई

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Masina Hospital Mumbai Dead Body Issue : याप्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Negligence case at Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना हॉस्पिटल या धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयातून एक अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासला जाईल अशी बाब समोर आली आहे. या ठिकाणी एका महिला पत्रकाराच्या वडिलांचे निधन झाले होते, मात्र  पैसे आणि प्रोसेस अभावी मृतदेह जवळपास आठ तास रुग्णालय प्रशासनाने अडवून ठेवल्याची संतापजनक घटना या ठिकाणी घडली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होवू लागल्यानंतर अखेर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार महिला पत्रकाराचे वडील महेश भालेराव यांना ८ जानेवारी रोजी मसिना हॉस्पिटल ट्रस्टमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १० जानेवारीला पहाटे त्यांचे निधन झाले. यामुळे भालेराव कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र या परिस्थितीतही मसीना रुग्णालयाने पैसे आणि डॉक्युमेंट प्रोसेसच्या नावाखाली तब्बल आठ तास मृतदेह अडवून धरला.

भालेराव कुटुबीयांनी वारंवार विनंती करूनही रुग्णालयाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. रुग्णालयाच्या ट्रस्टी कविता पै. यांना भेटण्याच्या विनंती केली गेली, पण त्यांनीही भेट दिली नाही. इकडे महिला पत्रकार दु:खात असूनही त्यांना रूग्णालयाने प्रोसेसच्या नावाखील इकडून तिकडे फेऱ्या मारायला भाग पाडल्याचं समोर आलं आहे.

याआधी  पेशंटला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आधी तीन लाख भरा तरंच ऑपरेशन होईल, असेही सांगण्यात आलं होतं. भालेराव कुटुबीयांनी ते पैसेही कसेबसे भरले होते परंतु तरीही त्यांच्या घरातील कर्ता पुरुष वाचला नाही. यानंतरही रूग्णालय प्रशासनाकडून दु:खात असणाऱ्या भालेराव कुटुंबीयांना त्यांच्या माणसाचा मृतदेह देण्यास प्रचंड विलंब केला गेला. या सर्व प्रकाराने संतापलेल्या महिला पत्रकाराने घडल्या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री कार्यालय आणि चॅरिटी कमिशनर, मुंबई यांच्याकडे नोंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT