मुंबई

माथेरानमध्ये पर्यटकांची वर्दळ असणारे रस्ते चकाचक होण्यास सुरुवात

अजय कदम

मुंबईः  प्रदुषणमुक्त असलेलं थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकिक असलेल्या माथेरानमधील अंतर्गत रस्ते चकाचक होण्यास सुरुवात झाली आहे. 25 कोटी रुपये खर्च करून तब्बल अकरा अंतर्गत रस्त्याचे कामे प्रगती पथावर आहे. येथील बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी कामाची पाहणी करून प्रगतीपथावर असणाऱ्या कामावर समाधान व्यक्त केले आहे.

माथेरान मधील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले सात पॉईंट तसेच शारलोट तलाव येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. मात्र इतके वर्ष होऊन निधी अभावी हे रस्ते भकास झाले होते.  पर्यटकांना चालणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर कैफियत मांडली. माथेरानची भौगोलिक परिस्थितीची माहिती असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांसाठी 25 कोटींचा भरीव निधी दिला. नगरपालिकेने सात पॉईंटला तसेच शारलोट तलावाशेजारील डेंजर पाथ हा रस्ता बनविण्यासाठी निविदा काढून ठेकेदारांमार्फत कामे सुरू केली आहेत.

यामध्ये रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, बेलवेडीयर पॉईंट आणि बेलवेडीयर पॉईंटकडून डेंजर पाथला जोडणारा रस्ता यांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यांची पाहणी येथील बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी केली.

ब्रिटिश काळातील हे रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर होते. नगरपालिकेच्या उत्पन्न कमी असल्याने हे रस्ते होणे शक्य नव्हते. तेव्हा आम्ही या रस्त्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन रस्ते होण्याकामी प्रस्ताव सादर केले. त्यांना येथील भौगोलिक परिस्थिती ज्ञात असल्याने त्यांनी या कामाला हिरवा कंदील दाखवून 25 कोटींचा भरीव निधी दिल्यामुळे माथेरान मधील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत.
प्रसाद सावंत, बांधकाम सभापती

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Matheran Internal road work in progress started working

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT