Ravi Rana Navneet Rana
Ravi Rana Navneet Rana sakal
मुंबई

Navneet Rana: "न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे"; राणा दाम्पत्याला कोर्टानं झापलं!

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात सध्या मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. पण राणा दाम्पत्य कोर्टात वारंवार गैरहजर राहिले आहेत. आजही त्यांनी कोर्टात गैरहजेरी लावली, यानंतर कोर्टानं त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे अशा शब्दांत त्यांना झापलं. (Matoshree Hanuman Chalisa Chanting Case Navneet Rana Ravi Rana Mumbai session court slams)

कोर्टानं सर्वांना झापलं

राणा दाम्पत्याच्या कोर्टात गैरहजेरीची न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळं खासदार नवनीत राणा यांची गैरहजेरी समजू शकतो, पण आमदार रवी राणा गैरहजर का? असा सवाल यावेळी कोर्टानं विचारला.

विशेष म्हणजे राणा यांचे वकील रिझवान मर्चंट कोर्टात गैरहजर, सरकारी वकील सुमेर पंजवानी गैरहजर, केस तपासाधिकारी सुट्टीवर असल्यानं कोणीच कोर्टात हजर नव्हते. यामुळं कोर्ट भडकलं आणि न्यायव्यवस्था म्हणजे गंमत नव्हे, अशा शब्दांत कोर्टानं या सर्वांना झापलं.

सरकारी वकिलांवर कठोर शब्दांत नाराजी

या खटल्यासाठी उपस्थित असलेल्या ज्युनिअर वकिलांना कोर्टानं यावेळी कानपिचक्या दिल्या. धावपळ करून पोचलेल्या सरकारी वकील सुमेश पंजवानी यांच्यावरही कोर्टानं यावेळी कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली.

राणा दाम्पत्याला अखेरची संधी

नवनीत आणी रवी राणा यांना कोर्टानं दिली अखेरची संधी. दोघांनाही 28 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. सरकारी पक्षाकडून सुरु असलेल्या चाल ढकलीचीही कोर्टानं यावेळी विशेष नोंद घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT