मुंबई

मुख्यमंत्री, शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला अटक; एटीएसची कारवाई

अनिश पाटील

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केल्यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या माथेफिरूला कोलकात्यातून अटक करण्यात आली होती. याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही आलेल्या धमक्या त्यानेच दिल्याचे चौकशीत कबुल केले आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधीत पथकाने(एटीएस) त्याला अटक केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना तर एका माथेफिरूने सोशल मिडियावर खुल्ली जिवे मारण्याची धमकी दिली होती.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेपासून ते सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेळोवेळी शिवसेना नेते संजय राऊत भाजपला अंगावर घेत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर राऊतांनी तिला चांगलेच फटकारले. दोघांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला. कंगनाने मुंबई मला पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटत असल्याचे विधान केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. या वादा दरम्यान कंगनाच्या एका चाहत्याने समाज माध्यमाद्वारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संबधित व्यक्तीचा माग काढला. त्यावेळी तो कोलकत्ता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने त्याला अटक केली आहे.  त्याला कोलकत्तामधील न्यायालयात हजर करून  ट्रान्झिस रिमांडद्वारे मुंबईत आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून दुबईत काम करतो. त्याच्याकडून

याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानीही यांनाही त्यानेच धमकीचे दूरध्वनी केल्याचे चौकशीत कबुल केले आहे.त्यासाठी त्याने दुबईतील मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्याच्याकडून दोन मोबाईल संच, भारतातील एक सीमकार्ड व दुबईतील तीन सीमकार्ड जप्त करण्यात आली आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT