महेंद्र दळवी
महेंद्र दळवी 
मुंबई

शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्यावर सर्वाधिक गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेले अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील ७८ उमेदवारांत ते याबाबत आघाडीवर आहेत. 

घरगुती हिंसाचार, चोरी, मारामारी, जमीन हडप करणे या संदर्भात अलिबाग पोलिस ठाण्यात २०१० पासून दळवींविरोधात गुन्हे दाखल आहेत. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या नावावर मौजे तुडाळ सर्व्हे क्रमांक  १६/२ मध्ये खाणपट्टा आहे. खनिकर्म अधिकारी रायगड यांनी १५ कोटी ३५ लाख ११ हजार ३२५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यातील दंडात्मक रक्कम २८ लाख १९ हजार २५१ रुपये २६ सप्टेंबरला शासकीय चलनाने भरली आहे. जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या ७८ उमेदवारांमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्‍वभूमी दळवी यांची आहे. गुन्ह्यांबाबतची माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

ही आहेत कलमे
घरगुती हिंसाचार कायदा कलम १२, १८, १९, १९, २, २०
भारतीय दंड संहितेचे कलम ३७९, जमीन महसूल कायदा १६७, १८२
भारतीय दंड संहितेचे कलम ३२४, १४३, १४७, १४८, ४२७, ३२३, ५०४, ५०६, मु. पो. ॲक्‍ट ३७१, ३, १३५ ॲट्रॉसिटी ॲक्‍ट ३१, १०, ६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT