Ajit Pawar Esakal
मुंबई

Ajit Pawar: 'अजित पवारांना लवकर मुख्यमंत्री होऊ दे'; 'लालबागच्या राजा'ला साकडं

अजित पवार समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून वारंवार उल्लेख केला जातो

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गणोशोत्सवाची धामधूम सूरूच आहे. आज गणेशोत्सवाचा नववा दिवस आहे. मंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्यभरातून लोक गणेशोत्सवासाठी येतात. तर मुंबईच्या गणेशोत्सवाला तोबा गर्दी होते. राज्यातील अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती, राजकीय नेते ही मंडळी देखील गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. तर नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. लालबागच्या राजाच्या समोर लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस बोलतात.

तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी रणजीत नरोटे यांनीही एक नवस केला आहे. "अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे," असा मजकूर असलेली एक चिठ्ठी त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण केली आहे.

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर पार्थ पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आदी नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी रणजीत नरोटे यांनी लिहलेली एक चिठ्ठी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली. त्यावर "हे लालबागच्या राजा, आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे", असं लिहिलं होतं.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे बॅनर्स राज्याच्या विविध भागात लावण्यात आले होते. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा अनेक नेते व्यक्त करत असतात. अशातच आज अशी चिठ्ठी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT