Rajeev Patil esakal
मुंबई

Rajeev Patil : निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहनिर्माण संस्थेत स्वतंत्र मतदान केंद्राची महापौर राजीव पाटील यांची मागणी

निवडणूक आयोग ज्या पद्धतीने २०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या गावामध्ये वेगळे स्वतंत्र मतदान केंद्र उभारते

सकाळ डिजिटल टीम

विरार : दोनशे पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थे मध्ये स्वतंत्र मतदान केंद्र उभारणी करण्यात यावी जेणे करून मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होऊ शकेल. असे निवेदन वसई विरार मनपाचे महापौर राजीव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याने त्यांच्या ह्या मागणीवर जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

राजीव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले आहे कि, लोकसभा निवडणुकीच्या वेळी नागपूर मध्ये ज्या पद्धतीने मोठमोठ्या गृहनिर्माण संकुलात स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात आली होती, त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्यातील मोठ्या शहरामध्ये उदाहरणार्थ वसई, नालासोपारा, विरार, सफाळे, पालघर, बोईसर आणि डहाणू या शहरी भागात स्वतंत्र मतदान केंद्र उभारणे आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

निवडणूक आयोग ज्या पद्धतीने २०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या गावामध्ये वेगळे स्वतंत्र मतदान केंद्र उभारते, त्याच पद्धतीने सदर शहरी भागात ज्या गृहनिर्माण संस्थे मध्ये दोनशे पेक्षा जास्त मतदार असतील अशा ठिकाणी स्वतंत्र मतदान केंद्राची आवश्यकता आहे. असेही त्या निवेदनात सांगण्यात आले आहे. सध्या कमी होत असलेल्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय होऊ शकेल.

यासंदर्भात अनेक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी माजी महापौर पाटील यांनी संवाद साधला आणि त्यांचे मत जाणून घेतल्यावर त्या सर्व गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याकरता अनुकूलता दर्शविली आहे. आपल्या जिल्ह्यातील साधारण सर्वच गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या संस्थेच्या आवारात मतदान केंद्र उभारल्यास त्यासाठी सहकार्य करण्यासाठी तयार आहेत.तरी यावर सकारात्मक पद्धतीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी निवेदनात शेवटी केली आहे. या सर्व गृहनिर्माण संस्थेची यादी लवकरच देण्यात येणार आहे. असे निवेदनात शेवटी म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT